तुम्ही नक्कीच विशेष आहात..
होय तुम्ही विशेष व्यक्ती आहात, तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व धारण केलेली आसामी आहात,होय मी खरच सांगतो जगातील प्रत्येक माणूस हा विशेष आहे. तो स्वतःला कॉमन मॅन म्हणून समजत असला तरी प्रत्यक्ष तसे नसतं. प्रत्येक माणसामध्ये असामान्य निर्मितीची क्षमता गुण असतात परंतू त्या क्षमताना पुरेसा वाव न मिळाल्याने त्या क्षमतांचा विकास होत नाही. ज्यांनी या गुणांचा वापर केला ते आपल्या जीवनात यशस्वी झाला असून यशाच्या शिखरावर विराजमान झाल्याचे दिसुन येतात. आपल्या आजूबाजला अशी अनेक माणसे असतात कि ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढून जीवन समृद्ध केलं आहे..एक महान संगीतकार फेलिज नाविदाद ज्याने नाताळच्या सणाला गायले जाणारे " मेरी क्रिसमस " हे जगविख्यात गाणं लिहिले व सुरबद्द्ध रित्या रचून जगभर.जगभरातील तमाम जनतेच्या हृदयात स्थान मिळवून यशाचे शिखर गाठले तो गीतकार जन्मतः अंध होता,तो भिख मागण्या शिवाय काही करू शकणार नाही असे त्यांच्या बाबत बोललं जातं होत, पण फेलीज नविदाद कडे एक महान संगीतकार होण्याचं स्वप्न उराशी होत,त्याने एक जुनी गिटार विकत घेतली, ती कशी वाजवायची हे तो शिकला