EVERY MINUTE IS A OPPORTUNITY.

होय, 
      प्रत्येक क्षण एक महान संधी आहे.त्या क्षणाचा तुम्ही कसा वापर करता यावर तुमच्या जीवनाची दिशा ठरत असते.तुम्ही या अमूल्य क्षणाचा वापर तुमचे आयुष्य बदलण्या साठी सोन्याचा मुळामा देण्यासाठी करता की दुसऱ्याच्या दोष शोधण्यासाठी करतं आहात यावर तुमच्या जीवनाची वाटचाल निश्चित होत असते. 

जीवन आनंदमय सुखमय समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... मित्रानो प्रत्येक मिनिट म्हणजे महान कार्याची सुरुवात आहे, प्रत्येकक्षणात आपल्या जीवनात बदल होत असतात आपले आयुष्य खर्ची पडत असते कारण प्रत्येकक्षण एक मिनिट तयार करून त्याचे तास घडवितात , तासाचे दिवस, महिने व वर्ष निर्मितीची क्षमता प्रत्येक क्षणात आहे.त्या क्षणाचा , संधीचा फायदा ज्याने घेतला तो आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे.
    ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला क्षणाचे महत्व काय असते हे त्यांच्या पेक्षा जास्त दुसऱ्या कुणाला माहीत नसते. एका क्षणाच्या फरकाने सुवर्ण पदक विजेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या अनेक स्पर्धकांना या महान क्षणाच महत्व लक्षात न आल्याने त्यांना हुलकावणी देऊन ज्यांनी या महान क्षणी योग्य निर्णय घेतला त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालुन त्यांचे जीवन समृद्ध केलं आहे.
         हुसैन बोल्ट  .. पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान धावपटू. उत्तर अमेरिकेतील जमैका प्रांतातील एका खेड्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या तरुण, जन्मतः प्रचंड मेहनत करण्याची तयारी व जागतिक कीर्तीचा बहुमान मिळवुन विश्वविक्रम करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ऑलम्पिकमध्ये  १०० मीटर धावण्याची स्पर्धा त्याने केवळ ९.५८ सेकंदात जिंकली व जागतिक कीर्तीचा बहुमान पटकावला. कारण WINNER'S MINUTE HELPING YOU WIN IN EVERY AREA OF LIFE. मित्रानो जीवनातील कोणत्याही क्षेत्रा मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आपणास परमेश्वरा कडून बोनस म्हणून मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे. तसेच प्रत्येक क्षण एक जीवन समृद्ध करण्याची संधी आहे हे ओळखले पाहिजे. चला तर मित्रानो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेऊ या...
      . तुमच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा...                                रमाकांत पाटील.


Comments