MIRACLE OF NATURE

काल देशाच्या सन्मा. पंतप्रधानांनी सकाळी १० वाजता दूरचित्रवाहिनी वरून संबोधित करताना भारत देशात संचार बंदी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. 
भारतीय नागरिक सुरक्षित वातावरणात राहून देशातील करौना विषाणू संक्रमण थांबवुन या जागतिक महामारी संकटातून देशाला मुक्त करण्यासाठी संचारबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.मा. पंतप्रधान यांची घोषणा ऐकून काहीजण ज्यांना स्वतःच घर बंदी शाळा वाटते असे नाठाळ  नक्कीच नाराज झाले असतील, परंतु हा निर्णय देशहितासाठी व जनतेच्या रक्षणासाठी घेतला आहे याचं भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे.
        या जागतिक महामारी विरोधात सर्व जग लढत असताना जगातील सर्वच घातक उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावरील अना आवश्यक वाहतूक बंद झाल्याने हवेतील कार्बन डायऑक्साइड, धुळीचे लोट कमी झाल्याने हवा नैसर्गिकरित्या शुद्ध झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर अपघात बंद झाल्याने अनेकांचं जीव वाचले आहेत. देशातील अनेक नद्या प्रदूषण मुक्त होत आहेत, देशातील नद्या तलाव धरणे स्वच्छ करण्यासाठी मोजावे लागणारे हजारोकोटी रुपये व मनुष्यबळ वाचले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे झुडपे धूर धूळ मुक्त झाली असून हिरवी पाने आपले लक्ष वेधून घेत आहेत. कित्येक वर्षांपासून निरभ्र आकाश पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
        गेल्या पाच वर्षा नंतर माझ्या घराच्या बाल्कनीत डाळिंबाच्या झाडावर दोन हमिग्नबर्ड येरझाऱ्या घालत असल्याने मला फार आनंद झाला. त्याच बरोबर व्हॉट्स ऍप वर एक व्हिडिओ मध्ये नवी मुंबई seawoods खाडी किनाऱ्यावर फ्लेमिगो या परदेशी पाहुणे पक्षांनी मोठी गर्दी केली आहे. वस्तुतः हिवाळ्यात हे पक्षी काही दिवस नवी मुंबई परिसरात दिसत असतात परंतू कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असुन देखील हे पक्षी येथे गर्दी करत आहेत हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. आज निसर्ग मानवास हाक देत आहे, तुम्ही निसर्गाशी एकरूप होऊन गेले तर निसर्ग नक्कीच आपणास वाचविणार आहे नाहीतर भौतिक विकासाच्या हव्यासापोटी विनाश अटळ आहे असा इशारा नकळत निसर्गाची आज जगाला दिला आहे. याच्यातून धडा घेउन विकासाच्या अनेक योजना निसर्गाला पर्यावरणाला अनुकूल असतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. 
           कारोणा विषाणू महामारीनें देशातील सामाजिक व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणला तो म्हणजे आधुनिक युगात अस्तित्वात असलेली विभक्त कुटुंब व्यवस्था पुन्हा भावनिक आधारासाठी एकत्र कुटुंबपद्धतीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक सामाजिक मानवतेच्या दृष्टिकोनातून एकमेकांना मदत करत आहेत त्याच बरोबर पुन्हा एकदा गावाकडे चला , गावाकडील निसर्गाची ओढ मानवी मनास लागावी हा खरा निसर्गाचा चमत्कार आहे.... रमाकांत पाटील

Comments