YOU ARE ALWAYS WINNER

"YES YOU ARE ALWAYS WINNER., YOU BORN FOR WIN ".   मित्रानो. खरच सांगतो जगातील प्रत्येक माणूस हा विजेता आहे. तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही विजेता आहात.९९% लोकांचं उत्तर नाही अस असणार आणि येथेच तुम्ही चुकत असता.कारण विजयाची व्याख्या तुम्ही कुठल्या तरी स्पर्धेस जोडली असणार ती राजकीय, सामाजिक, . आर्थिक ,शिक्षण अशा विविध क्षेञाशी संबंधित असेल.या सर्व भौतिक विकासाच्या नावाखाली घेण्यात येणाऱ्या स्पर्धा असून त्यात जय मिळविणे शक्य असले तरी आपण भीतीपोटी किंबहुना लोक काय म्हणतील याला घाबरून त्यामध्ये स्वतःला झोकून देत नाहीत. मित्रानो तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या मेहनतीवर उभे आहात. अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला येणारा देखील स्वतः प्रचंड मेहनत करून जीवनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ मिसाईल मेन डॉ.अब्दुल कलाम यांनी तर लहान वयात अनेक हलाकित आपले शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांनी पाहिलेले अणुऊर्जा संपन्न भारत साकारण्याचे त्यांचे स्वप्न उराशी बाळगून ते साकारून दाखविले. रेल्वे प्रवासात गुंडां ना प्रतिकार करत असताना चालत्या रेल्वेतून गुंडांनी फेकून दिल्याने पाय गमावून बसले असताना केवळ जिद्द चिकाटी व एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करणारी  अरूनिमा सिन्हा भारतीय महिला.  मित्रहो तुम्ही दररोज सकाळी उठल्यापासून काहींना काही करत असल्याने तुमच्या जीवनात काहींना काही बदल होत असतो, तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण देत असता, आईं वडिलांना त्यांची उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असता, त्याच बरोबर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असता ,न कळत तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडवून जीवनात यशस्वी झाले असतील तर मित्रानो तुम्ही नक्कीच विजेता आहात. जेव्हा तुम्ही मी जिंकणार आहे असा विचार मनात ठेऊन काम सुरू कराल, तुमच्या स्वप्नांना गवसणी घालण्याचा प्रयत्न सुरू करणार त्याच बरोबर तुम्ही नक्कीच विजेता होणार हे निश्चित... रमाकांत पाटील

Comments