तुम्ही श्रीमंत होऊ शकता..

रिचर्ड टेम्पलर या महान  लेखकाने अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण  मांडणी केलेल्या  the Rules of wealth लेखातील अनेक विचार आजच्या काळात मध्यमवर्गीय व गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणांना स्फूर्ती देऊन जातात.या जगात सर्वात मोठी समस्या आहे की आपण आपल्या आजच्या परिस्थितीला दुसऱ्यास जबाबदार धरून त्यांच्यावर दोषारोप करून स्वतःची सुटका करून घेताना अनेक जन दिसून येतात. कधी राजकीय नेत्यांना धार्मिक संस्थांना तर कधी शासन व्यवस्था यांना आपल्या मागासपणास जबाबदार धरून त्यांच्यावर दोषारोप करीत असल्याची चर्चा अनेकदा आपण ऐकत असतो. मित्रानो आपल्या आर्थिक परिस्थिती साठी बरेचदा आपण स्वतः जबाबदार असतो . आपण कधी श्रीमंत होण्याचं स्वप्न बघितलं नसतं जर तसे स्वप्न विचार आपल्या मनात येत. असतील तर त्यासाठी आपण योग्य मार्गाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील ९०% जनता आजही नोकरी पलीकडे जाऊन काही विचार करीत नाहीत, याचाच परिणाम आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठिंबा देण्याऐवजी त्यांना नोकरी कडे पाठविले जाते. यांच्यातच अनेक जन आजच्या परिस्थितीला बाजारातील अनेक श्रीमंत होण्याच्या संधी गमावत असतात. आज जागतिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यांचा वापर केला तर आजचा तरुण 40 वर्षाच्या आतच करोडपती होताना दिसत आहेत.तर काही जण नोकरी करण्यात इतके गुंतले आहेत की ते श्रीमंत होण्याचं विसरून गेले आहेत. तुमच्या नोकरीच्या उत्पन्नात तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही याची कल्पना असूनही तुम्ही नोकरी करत आहेत ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्याचा काही वेगळा, चांगला मार्ग असू शकतो याचा विचार करायला सुद्धा फुरसत मिळत नाही. आपल्या आर्थिक परिस्थिती कडे दुर्लक्ष करण्याचा गुन्हा करणारे बरेचजण असतात. तुम्ही पैशासाठी नोकरी करत असाल तर जास्तीत जास्त पैसा कमावणे हे तुमचं कर्तव्य आहे. काम ही आवडते व श्रीमंत ह्योवयाच तर मग कामात इतके बुडून जाऊ नका की पैसे कमावण्याची संधी विसरून जाल. शिवाय नोकरी व्यतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी उपलब्ध इतर मार्गाचा विचार करावा . आपला दृष्टिकोन बदला निर्णय घ्या त्या विचारात स्वतःस पूर्ण शक्तीने ढकलून द्या. यश नक्कीच मिळेल , तुमची आर्थिक समृद्धी कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी माझ्या शुभेच्या.... रमाकांत पाटील

Comments