HEALING WITH SPIRITUAL TOUCH

There is no other spiritual teacher other than your own soul... Swami Vivekananda's . आज दि.  १५/०४/२०२० रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयात जात असताना  carona virus corontain ward मध्ये एक ८ ते १० वर्ष वयाची मुलगी तिच्या आई सोबत येरझारा घालत असल्याचे खिडकीतून दिसत होती. तिला पाहून माझा सहकारी मला म्हणाला सर ती मुलगी चार दिवसापासून corontain वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आली आहे,किती उदास दिसत आहे. सर्व लोक घरी बसल्याने उदासीन जीवन जगत आहेत. अशा वेळी तुम्ही काय केलं असतं.मी एक मिनिट स्तब्ध होऊन म्हणालो मी १४ दिवस अनेक पुस्तके वाचली असती, लेखन केले असते तसेच यूट्यूब वरून विविध व्हिडिओ पाहून माझ्या ज्ञानात मोलाची भर घातली असती अशी संधी सर्वांना मिळत नाही मित्रा. एकंदरीत Corona virus  मुळे सर्वत्र भीती युक्त शांतता पसरली आहे.अनेक माणसे मानसिक तणावाखाली जीवन जगत असल्याची चर्चा प्रसारमाध्यांद्वारे पहावयास मिळत आहे. शासन स्तरावर या महामारी विरोधात मोठा संघर्ष  सुरू आहे. गेल्या २३ दिवसापासून घरात अडकलेल्या लोकांना लोकशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या व्यक्ती स्वतंत्रते चे महत्व काय असते याची जाणीव नक्कीच झाली असावी. आज जगभर पसरलेल्या या महामारी ने अनेक महासत्ता उध्वस्त होताना दिसतात. जगात या रोगाला आवरण्यासाठी अद्याप उपाय सापडला नाही. विज्ञान हतलब झाल्याने मनुष्य प्राणी परमात्म्याच्या आधारासाठी विनंती करीत आहे. विकासाच्या नावाखाली. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या मानवाला पुन्हा निसर्गाची ओढ लागली आहे. मित्रानो या युनिव्हर्स मध्ये एक मोठी शक्ती सामावलेली आहे, तीच अस्तित्व आहे ते परमात्म्याच्या स्वरूपात असेल किंवा दुसऱ्या स्वरूपात.या वैश्विक शक्तीला माणूस विसरून केवळ
भौतिक विकासाच्या नावाखाली सुखाच्या शोधात धावत राहुन आपली मूळ संस्कृती विसरला. या भारत भूमीस आध्यत्माचा मोठा वारसा लाभलेला आहे, माणसानं कसे जगावे या संदर्भात अनेक धर्म ग्रंथात, वेद,उपनिषदे, यामध्ये प्रामुख्याने विचार मांडले गेले आहेत पण आधुनिकतेची कास धरली, संत ज्ञानदेव संत तुकाराम यांचे विचार विसरून गेलो. हिंदू धर्म ग्रंथात असो तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्मात .. मानवाने स्वतःचा आत्मिक  व अध्यात्मिक विकास केला पाहिजे, मनावर नियंत्रण मिळविले पाहिजे जो पर्यंत तूम्ही तुमचा स्वयं अध्यात्मिक विकास करण्याची सुरवात करत नाहीत तो पर्यंत आत्मिक बळ वाढणार नाही , मग मोठ संकट  महामारी समोर तुमचे मनोधर्ये कमकुवत झाल्याने त्याला तुम्ही नक्कीच बळी पडू शकता. चला मित्रानो पुन्हा आपण या भारत भूमीस ऋषी मुनी संत महात्मे यांनी निर्माण केलेल्या आध्यात्मिक जीवनाचा पुन्हा एकदा वापर आपले जीवन आनंदमय सुखमय समृद्ध करण्यासाठी करू या .भारत भूमीच्या समृद्ध संस्कृतीचा परंपरेचा वारसा जगाला सांगू या..... रमाकांत पाटील.

Comments