फक्त एका मिनिटात जीवन बदलू शकत..

 मित्रानो ,आपण सर्वात मोठा प्रवास एका पावलाने सुरू होतो. तुमच्या कडे अगदी एकच मिनिट जरी असलं तरी कोणास ठाऊक,त्या मिनिटात तुम्ही तुमचं आयुष्य कदाचित बदलुन देखील टाकाल. 
      ...कोणत्याही प्रकल्पात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती सूरवात करणं. पहिलं पाऊल टाका व प्रवासाला सुरुवात करा. मोठं स्वप्न बघा, मोठा विचार करा आणि आयुष भरभरून जगण्याचं धाडस करा.  महान गोष्टी लहान वेष्टनात येतात. 
    ...एक मिनिट हे खूप महत्त्वाचे आहे . सगळ्या यशाची सुरुवात करण्याचा तो एक मानबिंदू आहे.आयुष्य बदलण्यासाठी, संदेश देण्ासाठी, मुद्दा मांडण्यासाठी फार वेळ लागत नाही. _ फक्त एक मिनिट लागत. पेनिज पासून जसे डॉलर बनतात तशीच मिनिट तास घडवितात. त्या वेळे बद्दल जागरूक राहुन मिनिटाचा आदर केला पाहिजे एकदा गेलेले ते मिनिट पुन्हा गवसणार नाही. तुम्ही तुमच्या मिनिटाचा कसा वापर करता त्याच्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास , यश निश्चित होत असते. 
              प्रत्येक दिवसाचे चोवीस तास,१४४० मिनिट आपल्या सर्वांच्या कडे असतात. श्रीमंतांच्या व गरिबांसाठी सारखाच वेळ असतो.त्या मुळे  आपल्या वेळेचं आपण काय करतो  यावर आपले भाग्य समजतो. प्रत्येक मिनिट म्हणजे महान तेची अंतर्भूत शक्ती आहे. जेव्हा या मिनिटाचा वेळेचा शहाणपणाने सदुपयोग केला जातो तेंव्हा ती मिनिट देखील प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतील व एका मिनिटात तुमचं आयुष्य खूप बदलू शकत . 
           आपण आपलं सर्वस्व ओताव, आपल सर्वाधिक चांगलं करावं, अशी संधी देणारा म्हणून प्रत्येक दिवसा कडे पाहणं, ही आज यश मिळवण्याची पायरी आहे. यशाकडे आपण केवळ आपल  इष्ट स्थळ म्हणून न पाहता सातत्याने साहस आणि आव्हान यांनी भरलेला एक प्रवास या दृष्ीकोनातून बघायला पाहिजे. तस जर केलं तर तुमचं आयुष्य बदलण्याची प्रक्रिया चालू केलेली असेल. 
          तुम्ही आज जेथे आहात तिथपासून तुम्ही काय होऊ शकता त्या परिवर्तनाची प्रक्रिया तुमच्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळे  सुरू झालेली असते. आयुष्य अतिशय अनिश्चित व अकल्पित आहे, म्हणून आपण फक्त दिवसच नाही तर क्षणही पकडला पाहिजे...         रमाकांत पाटील

Comments