तुम्ही नक्कीच विशेष आहात..

होय तुम्ही विशेष व्यक्ती आहात, तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व धारण केलेली आसामी आहात,होय मी खरच सांगतो जगातील प्रत्येक माणूस हा विशेष आहे. तो स्वतःला कॉमन मॅन म्हणून समजत असला तरी प्रत्यक्ष तसे नसतं. प्रत्येक माणसामध्ये असामान्य निर्मितीची क्षमता गुण असतात परंतू त्या क्षमताना पुरेसा  वाव न मिळाल्याने त्या क्षमतांचा विकास होत नाही. ज्यांनी या गुणांचा वापर केला ते आपल्या जीवनात यशस्वी झाला असून यशाच्या शिखरावर विराजमान झाल्याचे दिसुन येतात. आपल्या आजूबाजला अशी अनेक माणसे असतात कि ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढून जीवन समृद्ध केलं आहे..एक महान संगीतकार फेलिज नाविदाद ज्याने नाताळच्या सणाला  गायले जाणारे  "मेरी क्रिसमस " हे   जगविख्यात गाणं लिहिले व सुरबद्द्ध रित्या रचून जगभर.जगभरातील तमाम जनतेच्या हृदयात स्थान मिळवून यशाचे शिखर गाठले तो गीतकार जन्मतः अंध होता,तो भिख मागण्या शिवाय काही करू शकणार नाही असे त्यांच्या बाबत बोललं जातं होत, पण फेलीज नविदाद कडे एक महान संगीतकार होण्याचं स्वप्न उराशी होत,त्याने एक जुनी गिटार विकत घेतली, ती कशी वाजवायची हे   तो  शिकला गिटार वाजवत (सराव करत) असताना अनेकदा त्यांच्या बोटातून रक्त येत असे परंतु महान संगीतकार होण्याचं त्याच स्वप्न व त्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी या मानसिकतेमुळे तो लवकरच महान संगीतकार म्हणून उदयास आला मित्रानो आपल्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी या महान संगीतकाराने बाळगलेला स्वाभिमान, पाहिलेलं स्वप्न, त्यासाठी घेतलेली मेहनत हे आपल्यास बरेच शिकवून जाते. प्रत्येकात एक सुप्त शक्ती सामावलेली असते तिला जागृत करणे गरजेचे असते. मित्रानो स्वाभिमान ठेवा म्हणजे महान कार्याची सुरुवात तुम्ही नक्कीच कराल.या जगात तुम्ही मोठे व्हावे असे कुणालाच वाटत नाही, ज्यांवर आपण मोठे व्हावे यासाठी विश्वास ठेवतो त्यास तुमच्या भव्य स्वप्नांनी असुरक्षित वाटत असते. त्यामुळं तुम्हास स्वतः प्रचंड ऊर्जेने प्रारंभ करावा लागेल. माझ्या एका मित्राने आपल्या फेसबक पेजवर मी...... .....चा समर्थक अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मी त्यास  स्वतः ची जाहिरात प्रसिद्ध न करता दुसऱ्याच्या कुुुुुबड्या  घेऊन  मोठे व्हावे यासाठी केलेेेेल्या  खटाटोप    बाबत  मी त्याच्या कडे त्याााा विचारणा केल्यावर त्याच्याकडे काहीएक उत्तर नव्हते. लोकशाही व्यवस्थेत कुणाचे ना कुणाचे समर्थक लोक असणारच पण समर्थन करणारे हे भीती पोटी  किंवा लालसेपोटी स्वत्व गमावून बसतात. तुम्ही नक्कीच कराल अशा गोष्टी या जगात आहेत. तुम्ही स्वप्न बघा,एक पाऊल पुढे करा पहा तुमच्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय बदल कारण तुम्ही विशेष आहात, तुमच्यातील सुप्त शक्ती त्यावेळी जागृत झालेली असते. तुमच्या सकारात्मक भूमिकेबाबत निसर्ग देखील तुम्हाला मदत करत असताना अनुभवास येईल. मित्रानो 
एक म्हण आहे , जसे पेराल तसे उगवते   तुम्ही जसा विचार करता तसच निसर्ग प्रतिसाद देत असतो.  तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणू शकता , तुम्ही नक्कीच मोठे स्वप्न उराशी बाळगून असाल तरच ते नक्कीच पूर्ण होणार. तुम्ही तुमच्या सुप्त गुणांना बुध्दीला जसा आदेश द्याल त्याच प्रमाणे तुमच्या जीवनात घडून येईल. तुम्ही लखपती होण्याचं स्वप्न बघतं असाल तर तुम्ही लखपती व्हाल, जर तुम्ही धीरूभाई अंबानींचा आदर्श घेऊन स्वताच्या जीवनात उं झेप घेण्याची स्वप्न बघतं असाल व त्या अनुषंगाने प्रयत्न कराल तर एक दिवस तुमचे स्वप्न पूर्ण झालं असल्याचं तुम्हाला खात्री पटेल. मित्रानो तुम्ही नक्कीच विशेष आहात, तुमचा जन्म विशेष कामासाठी झालेला आहे , तुम्ही नक्कीच विजेता आहात.. तुमच्या भव्य स्वप्नांनी सजवलेलं आयुष भरभरून जगण्यासाठी माझ्या शुभेच्छा... रमाकांत पाटील

Comments